आधी हर हर महादेव चित्रपटाचा वाद आणि नंतर विनयभंगाचं प्रकरण...यावरुन राष्ट्रवादी नेते आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड सध्या चांगलेच चर्चेत आलेत. कारण कलम ३५४ अंतर्गत मुंब्रा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर व्यथित झालेल्या जितेंद्र आव्हाडांनी आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक लक्ष वेधून घेणारं ट्विट केलंय.